'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मधल्या रोमांचक टोमाटिना फेस्टीवलला हजारोंनी लुटला आनंद, पहा स्पेन शहराचा नूरच पालटलाय
तुम्ही जिंदगी ना मिलेगी दोबारा सिनेमातला टोमॅटो एकमेकांना फेकून मारत जंगली पण तेवढ्याच उत्साहात खेळला जाणारा तो प्रसंग आठवतोय का?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सिनेमातून अनेकांना या टोमाटिना फेस्टिवलविषयी कळलं असेल. जगभरातील हौशी, उत्साही लोकं सध्या टोमॅटोची होळी खेळतायत.
सध्या पूर्व स्पेनमधील बुनोल या छोट्याशा शहरात हजारो रसिकांनी टोमाटीना फेस्टीवलमध्ये सहभाग घेतला. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या या उत्सवात भाग घेत अनेकांनी आनंद लुटलाय.
पिकलेल्या आंबट टोमॅटोच्या खाली पडलेल्या सॉसमध्ये लोळत, खेळत अनेकांनी आनंद लुटला. यावेळी बहुतांश जणांचे पांढरे कपडे लालेलाल झाले होते.
जगभरात हा उत्सव झाला. अनेक तरुणांचं आकर्षण बनलेला हा टोमॅटिना फेस्टीवल आजही अनेकांना एकदातरी अनुभवावासा वाटतो. एकमेकांवर टोमॅटो फेकत एकत्र उत्साहानं हा सण साजरा केला जातो.