Ganesh Chaturthi 2024 : मराठमोळी...स्वॅग तिचा भारी..! गणेश चतुर्थीला महाराष्ट्रीयन लूकमध्ये दिसाल भारी, फक्त 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2024) सणाची मोठ्या आतुरतेने भाविक वाट पाहत असतात. हा दिवस सर्वजण मोठ्या थाटामाटात साजरा करतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगणेश चतुर्थीचा सर्वाधिक उत्सव महाराष्ट्रात दिसून येतो. यंदा गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर रोजी येत असल्याने नागरिकांनी बाप्पाच्या स्वागताची तयारी जय्यत सुरू केली आहे.
बाप्पाचे स्वागत पारंपारिक वेशभूषेने केले जाते. महिला या दिवशी जय्यत तयारी करताना दिसतात. या गणेश चतुर्थीला तुम्हाला पारंपारिक महाराष्ट्रीयन वेशभूषा करायची असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रीयन लूक कॅरी करण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत, जेणेकरून तुमचा लूक सर्वात सुंदर दिसेल.
नऊवारी साडी -गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रीयन लूकमध्ये सुंदर दिसायचे असेल तर आधी नऊवारी साडी नेसा. नऊवारी साडी हा एक पारंपारिक साडीचा सुंदर प्रकार आहे आणि महाराष्ट्रीयन लूकसाठी सर्वात महत्वाचा आहे. ही साडी इतर साड्यांपेक्षा लांब आहे आणि ती नेसण्याची शैलीही वेगळी आहे.
सोन्याचे दागिने - बहुतेक स्त्रिया महाराष्ट्रीयन लूकमध्ये सोन्याचे दागिने घालतात. जर तुमच्याकडे सोन्याचे दागिने नसतील तर तुम्ही गोल्ड प्लेटेड ज्वेलरी देखील निवडू शकता. तुमच्या कानातल्यापासून नेकपीसपर्यंत सर्व काही सोन्याचे असावे.
पारंपारिक नथ - पारंपरिक नथीचा महाराष्ट्रीयन लूक पूर्ण करण्यात महत्त्वाचा वाटा आहे. याशिवाय तुमचा महाराष्ट्रीयन मेकअप अपूर्ण दिसेल. अशा वेळी तयारी करताना चुकूनही विसरू नका.
चंद्रकोर टिकली - कपाळावर चंद्रकोर टिकली ही मराठी महिलांची शान आहे. अशा वेळी जर तुम्ही महाराष्ट्रीयन लूक कॅरी करत असाल तर कपाळावर सामान्य टिकली लावण्याऐवजी चंद्रकोर टिकली लावा. जी तुमच्या लूकला चारचांद लावेल, दिसायलाही सुंदर दिसेल आणि यामुळे तुमचा लूक पूर्ण दिसेल.
गजरा लावलेला अंबाडा - तुमचा महाराष्ट्रीयन लुक पूर्ण करण्यासाठी तुमच्या केसांमध्ये अंबाडा बनवा. नऊवारी साडीसोबत मोकळे केस चांगले दिसत नाही. नऊवारी नेसल्यास केसांमध्ये अंबाडा बनवून त्यावर गजरा लावा. यामुळे तुमचे सौंदर्य वाढेल.
गणेश चतुर्थीला जर तुम्हाला महाराष्ट्रीयन लूकमध्ये भारी दिसायचंय तर, वरील गोष्टी नक्की लक्षात ठेवा. फोटो येतील छान..!