World Richest Families: 'ही' आहेत जगातली सर्वात जास्त श्रीमंत कुटुंब
फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, ही सहा कुटुंब जगातली सर्वात जास्त श्रीमंत कुटुंब आहेत. या सर्वांकडे अब्जावधी डॉलर्सची मालमत्ता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवॉल्टन कुटुंबातील तीन पिढ्यांनी वॉलमार्ट या जगातील सर्वात मोठ्या रिटेल चेनमध्ये गुंतवणूक केली आहे. जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी असलेल्या वॉलमार्टमध्ये कुटुंबाचा हिस्सा 50 टक्क्यांपर्यंत आहे. या कुटुंबाची एकूण संपत्ती 224.5 अब्ज डॉलर एवढी आहे.
मार्स इंक कंपनीचे मालक असलेले मार्स कुटुंब हे जगातील दुसरे सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. मार्क इंक कंपनीमध्ये कुटुंबाचा मोठा हिस्सा आहे. या कुटुंबाची एकूण संपत्ती 215 अब्ज डॉलर्स आहे.
फ्रेडरिक, चार्ल्स, डेव्हिड आणि विल्यम कोच यांना त्यांच्या वडिलांकडून तेल कंपनीचा वारसा मिळाला. कोच इंडस्ट्रीजच्या माध्यमातून कमाई करणारे हे कुटुंब जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब आहे. त्यांची एकूण संपत्ती 128.8 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
संयुक्त अरबवर जवळपास 90 वर्षांपासून राज्य करणारे अल सौद कुटुंब जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब आहे. त्याची एकूण संपत्ती 105 अब्ज डॉलर्स एवढी आहे.
फ्रेंच लक्झरी फॅशन ब्रँड हेर्मेस ही हेर्मेस कुटुंबाची मालमत्ता आहे. हे कुटुंब जगातील 5 वे सर्वात श्रीमंत कुटुंब आहे, ज्यांची मालमत्ता 94.6 अब्ज डॉलर एवढी आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचे कुटुंब जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब आहे. त्यांची एकूण संपत्ती 84.6 दशलक्ष डॉलर्स आहे.