Raksha Bandhan 2023: विविध रंगी राख्यांनी बाजार सजले; फोटोंमधून पाहा यंदाचे राखी ट्रेंड
यंदा बाजारात वेगवेगळ्या आकर्षक डिझाईनच्या राख्या आल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरक्षाबंधन सणासाठी रंगेबिरंगी, विविध कलाकुसर केलेल्या आकर्षक राख्यांनी बाजार फुलला आहे.
राखी खरेदीसाठी नागरिकांची बाजारात लगबग दिसून येत आहे.
यंदा फॅन्सी राख्यांसह पारंपरिक राख्या खरेदीकडे अनेकांचा कल दिसून येत आहे.
लहान मुलांनी आपल्या बहिणींकडे कार्टुनच्या राख्यांची मागणी केली आहे. लहान मुलांमध्ये छोटा भीम, मोटू पतलू, स्पायडर मॅन, किड्स टॉय, डोरेमॉन अशा राख्यांना अधिक मागणी आहे.
यावर्षी अनेक नवे ट्रेंड राख्यांमध्ये पाहायला मिळत आहेत.
ब्रो, बडे मिया, स्वॅग भाई अशा नावांचे डिझाइन असलेल्या पेंडण्टच्या राख्याही बाजारात दिसून येत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून हिट ठरलेली ब्रेसलेट राखीची क्रेझ यंदाही कायम आहे.
राख्यांमध्ये मोती, जरी आणि रुद्राक्षच्या राख्यांना अधिक मागणी आहे.
स्टोन, कुंदन वर्क, कलर्ड, बीड्स, घुंघरू, मिरर वर्क असलेल्या राख्या अधिक लक्ष वेधून घेत आहेत.
छोट्या गावांमध्ये अजूनही गोंड्यांच्या राख्यांना मागणी आहे.
हॅण्डमेड राख्यांना पसंती कायम आहे.
घरच्या घरी बनवलेल्या राख्यांना बाजारात मोठी मागणी आहे.
रुद्राक्ष, डायमंड, मोती, ओंकार राखी बाजारात उपलब्ध आहेत..
या राख्या अगदी 5 रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंतच्या किमतीत आहेत.
राखीपौर्णिमेनिमित्त देशभरातील विविध शहरांतील विविध भागात आकर्षक अशा राख्यांनी दुकानं सजली आहे.
दिल्ली, उत्तर प्रदेशात लोकांची गिफ्ट खरेदीसाठी, राखी खरेदीसाठी अक्षरश: गर्दी झाली आहे.
विविधरंगी राख्यांनी बाजारपेठा फुलल्या आहेत.
ऐन वेळेवर राखी खरेदीकडे लोकांचा ओघ आहे.
बाजारात राख्यांचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत.