World Cup 2023: गड आला, पण सिंह गेला... केन विल्यमसन दुखापतग्रस्त; न्यूझीलंड संघाला फटका
शुक्रवारी न्यूझीलंडचा बांग्लादेशविरुद्ध 2023 च्या वर्ल्ड कपमधील पहिला सामना झाला. या सामन्यात कर्णधार केन विल्यमसनने 107 चेंडूत 78 धावांची खेळी खेळली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण या सामन्यात विल्यमसनच्या अंगठ्याला दुखापत झाली.
या सामन्यात केनच्या नेतृत्वात न्यूझीलंडने बांगलादेशचा 8 गडी राखून पराभव केला होता.
केन विल्यमसन बॅटिंग करत असताना मुस्तफिझूर रहमानचा चेंडू त्याच्या बोटाला लागला.
यानंतर फिजिओ पथकाने मैदानात येऊन केन विल्यमसनची तपासणी केली. तरीही त्याला बरं वाटलं नाही आणि तो मैदानातून बाहेर निघाला.
दुखापतीमुळे त्याला पुढे बॅटिंग करता आली नाही.
यानंतर किवी चाहत्यांचं टेन्शन पुन्हा वाढलं आहे. विश्वचषकापूर्वी तो गुडघ्याच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधूनही बाहेर पडला होता.
पहिल्या दोन सामन्यातही तो खेळला नाही आणि आता पुन्हा एकदा त्याला दुखापत झाली आहे.
न्यूझीलंडच्या कर्णधाराने स्वतःच्या दुखापतीबाबत सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अपडेट दिलं आहे.
सामना संपल्यानंतर त्याच्या अंगठ्याला पट्टी दिसली. केनच्या अंगठ्याला सूज आली असून बोटाचा रंगही बदलला असल्याचं त्यांने सांगितलं.
न्यूझीलंड क्रिकेटनेही शनिवारी याची पुष्टी करत, एक्स-रेतून केन विल्यमसनच्या डाव्या हाताच्या अंगठ्यामध्ये फ्रॅक्चर झाल्याचं समजल्याचं वृत्त दिलं.
प्रशिक्षक गॅरी स्टेड यांना आशा आहे की, विल्यमसन तंदुरुस्त होऊन शेवटचे काही सामने खेळेल.
न्यूझीलंडचा पुढचा सामना बुधवारी चेन्नईत अफगाणिस्तानशी होणार आहे.