Most Expensive Watermelon : लाखो रुपये किंमतीला एक फळ, जगातील सर्वात महाग कलिंगडात नेमकं खास काय?
बाजारात 20 ते 30 रुपयांना मिळणारं कलिंगड तुम्हांला लाखो रुपयांना खरेदी करावं लागलं तर...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएका दुर्मिळ प्रजातीचं कलिंगडाची किंमत लाखो रुपये आहे.
जगातील सर्वात महाग कलिंगड जपानमध्ये मिळतं.
डेन्सुक ब्लॅक कलिंगड प्रजातीचे जगातील सर्वात महागडं कलिंगड आहे. याला काळं कलिंगड (Black Watermelon) असंही म्हणतात.
जपानच्या (Japan) होक्काइडो बेटाच्या (Hokkaido Island) उत्तरेकडील भागात हे अतिशय दुर्मिळ कलिंगड आढळतं.
ही कलिंगडाची प्रजाती इतकी दुर्मिळ आहे की, एका वर्षात या प्रजातीचे फक्त 100 कलिंगडांची लागवड केली जाते. यामुळे त्याची किंमत सर्वाधिक आहे.
डेन्सुक ब्लॅक कलिंगड सामान्य कलिंगडाप्रमाणे बाजारात विकलं जात नाही. या कलिंगडाचा दरवर्षी लिलाव होतो.
खरेदीदार हे कलिंगड मिळविण्यासाठी मोठी बोली लावतात. 2019 या वर्षात या कलिंगडासाठी 4 लाख रुपयांची सर्वात महागडी बोली लावली गेली होती.
हे कलिंगड दिसायला अतिशय चमकदार आणि काळ्या रंगाचं असतं. हे सामान्य कलिंगडाप्रमाणे दिसत नाही.
या कलिंगडाच्या आतील फळाचा गर कुरकुरीत असतो. हे खूप गोड असते आणि इतर कलिंगडाच्या तुलनेत यामध्ये कमी बिया असतात.