Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Guinness World Record : यांचा काही नेम नाही... जगातील सर्वात लांब जीभ, रचले दोन विश्वविक्रम
भलेभले लोक जीभेमुळे आपली मेहनत वाया घालवतात, असं म्हटलं जातं. पण जगात असा एक व्यक्ती आहे, ज्याने जिभेमुळे दोन विश्वविक्रम आपल्या नावे केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमेरिकेतील निक स्टोअबर्ल (Nick Stoeberl) नावाच्या व्यक्तीची जीभ जगातील सर्वात लांब आहे. याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे.
नुकताच निकने त्याच्या लांब जीभेने (Longest Tongue in The World) नवा विश्वविक्रम रचला आहे.
निकने लांब जीभेच्या साहाय्याने पाच जेंगा ब्लॉक काढण्याचा विक्रम केला आहे.
याआधी निकच्या नावावर जगातील सर्वात लांब जीभ असलेला पुरुष हा विश्वविक्रम आहे. त्याच्या जीभेची लांबी 10.1 सेमी आहे.
निक त्याच्या लांब जिभेने पेंटिंगही करतो. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
निक स्टोअबर्लने नुकताच नवीन रेकॉर्ड रचला आहे. त्याने 55.526 सेकंदामध्ये पाच जेंगा ब्लॉक काढले आहेत.
साधारणपणे महिलांच्या जीभेची सरासरी लांबी 7.9 सेमी तर पुरुषांच्या जीभेची सरासरी लांबी 8.5 असते. निक स्टोअबर्लची जीभ 3.97 इंट म्हणजे 10.1 सेमी आहे.