विराट-अजिंक्यच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, अखेरच्या दिवशी 280 धावांची गरज

चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली 44 धावांवर तर अजिंक्य रहाणे 20 धावांवर खेळत होते. रोहित शर्मा 43 तर चेतेश्वर पुजारा 27 धावांवर बाद झाला. टीम इंडियाला विजयासाठी 280 धावांची गरज आहे.

WTC Final,WTC Final 2023

1/6
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली जागतिक कसोटी विजेतेपदाची फायनल चौथ्या दिवसअखेर नाट्यमय वळणावर येऊन उभी ठाकली आहे.
2/6
ही कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाला आणखी 280 धावांची आवश्यकता आहे, ऑस्ट्रेलिया विजयापासून सात विकेट्स दूर आहे.
3/6
या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं आपला दुसरा डाव आठ बाद 270 धावसंख्येवर घोषित केला. त्यामुळं टीम इंडियासमोर विजयासाठी 444 धावांच्या पाठलागाचं कठीण आव्हान आहे.
4/6
पण भारतीय संघानं चौथ्या दिवसअखेर तीन बाद 164 धावांची मजल मारून कमाल केली.
5/6
चौथ्या दिवसाचा खेळ थांबला, त्यावेळी विराट कोहली 44 आणि अजिंक्य रहाणे 20 धावांवर खेळत होता.
6/6
गिल, रोहित अन् पुजारा बाद झाल्यानंतर विराट-रहाणे या जोडीने चौथ्या विकेटसाठी 71 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या आव्हानात जान कायम राखली आहे.
Sponsored Links by Taboola