Liquor in Car : तुम्ही कारमध्ये किती दारू नेऊ शकता? कायदा काय सांगतो?
Liquor in Car : ट्रीपला गेल्यानंतर बऱ्याच जणांना दारु पिण्याचा आनंद घ्यायचा असतो. मात्र, आपण कारमध्ये किती दारु नेऊ शकतो? कायदा काय सांगतो जाणून घेऊयात...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appट्रीपला जाताना नेहमी प्रमाणात दारू पिणे गरजेचे तर आहेच. शिवाय दारु पिऊन गाडी चालवणे टाळले पाहिजे.
image कारमध्ये किती प्रमाणात दारु नेऊ शकतो? याबाबत प्रत्येक राज्यात नियम आणि कायदे वेगळे आहेत.
काही राज्यांमध्ये पूर्णपणे दारुबंदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे अशा राज्यात तुम्ही दारुची एक बाटलीही नेऊ शकत नाहीत.
काही राज्यांमध्ये काही प्रमाणात दारु नेण्यास परवानगी आहे.
काही राज्यांमध्ये कारमधून 1 लीटरपेक्षा जास्त दारू नेऊ शकत नाहीत.
1 लीटरपेक्षा जास्त दारू नेल्यास बेकायदेशीर मानले जाऊ शकते.
कायद्याद्वारे निश्चित केलेल्या दारुपेक्षा जास्त दारु नेल्यास तु्मच्यावर कारवाई होऊ शकते.
जास्तीची दारू नेल्यास तुम्हाला 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो. शिवाय, 5 हजार रुपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो.
ट्रीपला गेल्यानंतर स्थानिक कायद्यांचे पालन करणे गरजेचे आहे.