Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Saffron Water : रोज सकाळी केशरचं पाणी प्या; अनेक आजारांवर आहे रामबाण उपाय
तुमच्या दिवसाची सुरुवात फ्रेश आणि आरोग्यदायी करायची असेल तर केशरचं पाणी हा तुमच्यासाठी अत्यंत रामबाण उपाय आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेशरचा समावेश मसाल्याच्या पदार्थांमध्ये केला जातो. तर, काही जण केशरला गोडाच्या पदार्थांत वापरतात. यामुळे पदार्थाला छान चव येते. परंतु, केशरमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत.
कॉफीमध्ये कॅफीनचा वापर केला जातो. जो आपल्या शरीरासाठी घातक आहे. अशा वेळी केशरचं पाणी प्यायल्याने तुम्ही निरोगीही राहाल आणि कॉफीइतकाच हे पाणी पिऊन तुमचा दिवसही उत्साही राहील.
तुम्ही जर रोज केशरचं पाणी प्यायलात तर तुमची स्किनही तजेलदार तसेच निरोगी राहील. कारण या पाण्यात कोणतंच केमिकलयुक्त पदार्थांचा समावेश नाही.
नियमित केशरचं पाणी प्यायल्यास काही दिवसांतच तुम्हाला तुमच्या केसांत बदल जाणवेल. तुमचे केस अधिक घनदाट होतील.
जर तुमच्या मासिक पाळीचा कालावधी कमी असेल आणि या दरम्यान पोटात वेदना होत असतील तर केशरचे पाणी प्यायल्याने वेदना कमी होण्यास आणि प्रवाह संतुलित करण्यास मदत होऊ शकते.
बुद्धीचा विकास होण्यासाठी केशर खूप महत्त्वाचे ठरते. बुद्धीचा विकास होण्यासाठी केशरमध्ये आवश्यक तेथे सर्व गुणधर्म आढळतात त्यामुळे लहान मुलांना केशर खायला दिल्यास त्यांच्या बुद्धीचा विकास होईल.
केसर ताणतणाव कमी करून बुद्धीचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी खूप फायद्याचे ठरते. त्यामुळे जर तुम्हाला ताण-तणाव आल्यासारखे वाटत असेल तर दुधामध्ये केशरचे काही तंतू घालून ते दूध पिल्यास ताण-तणाव कमी होऊन फ्रेश वाटते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.