अमेरिकेतील या गावात आहे प्रत्येकाकडे विमान, नाश्ता करण्यासाठीही लोक विमानाने जातात; पाहा फोटो
जगात असे एक ठिकाण आहे, जिथे विमानाने प्रवास करणे इतके सामान्य आहे की लोकांचे स्वतःचे विमान आहे. होय, तुमचा विश्वास बसणार नाही, पण जगातील एका गावात बहुतेक लोकांकडे विमान आहे. येथे लोक त्यांचे दैनंदिन काम विमानातूनच करतात आणि विमाने घराबाहेर गाड्यांसारखी उभी असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइथे प्रत्येक घराबाहेर विमाने उभी असतात. येथे विमान खरेदी करणे म्हणजे कार खरेदी कारण्यासारखं आहे. त्यामुळेच येथे बांधण्यात आलेल्या घरांची रचनाही अशा पद्धतीने करण्यात आली आहे की, त्यामध्ये विमान सहज पार्क करता येईल.
यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, या गावातील नेमकं चित्र कसं असेल, कारण येथे विमान आणि कार हे दोन्ही एकाच रस्त्यावर धावताना दिसतात. नेमकं कोणत्या देशातील आहे हे गाव, हे जाणून घेऊ...
स्प्रूस क्रीक (Spruce Creek ) हे अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यमधील एक गाव आहे.
या गावाला निवासी विमानतळ असेही म्हणतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथे सुमारे 5,000 लोक राहतात आणि 1,300 घरे आहेत. या गावात सुमारे 700 घरांमध्ये हँगर्स आहेत. विमान जेथे उभे असते त्या जागेला हँगर म्हणतात.
इथे गाड्यांसाठी गॅरेज बनवण्याऐवजी लोक त्यांच्या घरात हँगर बनवतात आणि त्यांची विमाने तिथे उभी असतात. विमान टेक ऑफ करण्यासाठी गावापासून हाकेच्या अंतरावर धावपट्टी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावात राहणारे बहुतेक लोक व्यावसायिक वैमानिक आहेत. म्हणूनच येथे विमान असणे सामान्य आहे. याशिवाय गावात डॉक्टर, वकील आदी आहेत. या लोकांना विमान ठेवण्याचाही शौक असतो.
इथल्या लोकांना विमानाची इतकी आवड आहे की, दर शनिवारी सकाळी ते धावपट्टीवर जमतात आणि स्थानिक विमानतळावर जाऊन नाश्ता करतात. हे लोक याला Saturday Morning Gaggle म्हणतात.