HealthTips : सर्दी, खोकला ते फॅटी लिव्हरपर्यंत अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासाठी लवंग उपयुक्त
लवंगमध्ये हेपॅटोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म असतात, जे मुक्त चयापचय क्रियाकलापांमुळे होणाऱ्या प्रभावांना विरोध करतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअँटिऑक्सिडंट्सच्या उपस्थितीमुळे, लवंग शरीराच्या अवयवांच्या, विशेषतः यकृताच्या आरोग्यासाठी एक चांगला पर्याय आहे.
अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की लवंगाच्या वापरामुळे शरीरात इन्सुलिन तयार होते आणि रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते.
लवंगात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म असतात. म्हणूनच ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे त्यांनी लवंगाचे सेवन करावे.
लवंगाची कळी शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढवण्याचे काम करते.
लवंगला एक विशेष सुगंध असतो. म्हणूनच श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
घसा खवखवण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही लवंग सेंद्रीय मिठाने चघळू शकता. हे घशाची सूज दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
जर तुम्हाला कोरडा खोकला किंवा सतत खोकल्याचा त्रास होत असेल, तर हा प्रभावी घरगुती उपाय करून पाहणे तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.