Health: ब्रेडला इतकी छिद्रं का असतात? यामागे आहे वैज्ञानिक कारण
भारतात दररोज लाखो ब्रेड पॅकेट्स विकले जातात. भारतीय लोक सामान्यत: सकाळच्या नाश्त्यात ब्रेडचा वापर करतात. काही जण जाम, बटर किंवा ऑम्लेटसोबत ब्रेड खातात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता ब्रेडवर इतकी छिद्रं का तयार होतात? याबद्दल जाणून घेऊया.
तर ब्रेड बनवताना त्याचं पीठ पहिलं आंबवलं जातं, त्यामुळे यावेळी पिठात होणारी किण्वन (Fermentation) प्रक्रिया याला कारणीभूत आहे.
ब्रेडसाठीचं पीठ मळून आंबायला ठेवल्यावर CO2 मुळे त्यात गॅसचे फुगे तयार होतात.
पीठ मळताना जास्त दाब दिल्यास त्याच्या आत छोटे-छोटे बुडबुडे तयार होतात.
तर पीठ मळताना कमी दाब दिल्यास पिठाच्या आत थोडे मोठे बुडबुडे तयार होतात.
एकंदरीत पीठ मळताना पिठावर जितका जोर दिला जाईल, तितके बुडबुडे कमी निघतील किंवा छोटे बुडबुडे तयार होतील.
जेव्हा ब्रेड ओव्हनमध्ये बेक होण्यासाठी टाकला जातो, त्यावेळी या बुडबुड्यांच्या ठिकाणी पोकळी निर्माण झालेली दिसते.
जेव्हा ब्रेड स्लाईसमध्ये कापला जातो, त्यावेळी त्यावर छिद्र निर्माण झालेली दिसतात.
ब्रेडवर छिद्र असणं हा ब्रेड बनवण्याच्या प्रक्रियेतील एक भाग आहे.