Trending News : 'या' देशात लग्नानंतर महिलांचे कान अन् ओठ कापले जातात; पण का? कारण वाचून व्हाल अवाक्...
या जमाती जंगलात राहतात आणि पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतात. येथील सरकारंही या आदिवासी जमातींच्या राहनीमानात ढवळाढवळ करत नाहीत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइथिओपियातील एका आदिवासी जमातीमध्ये फार विचित्र परंपरा आहेत. ही जगातील हिंस्त्र जमातींपैकी एक मानली जाते.
इथिओपियाच्या मुर्सी जमातीमध्ये एक अतिशय धोकादायक आणि प्रथा आहे. या प्रथा आजही पाळल्या जातात. मुर्सी आदिवासी जमातीमध्ये लग्नानंतर महिलांना त्यांचे कान आणि ओठ कापावे लागतात.
लग्नानंतर मुर्सी महिलांचे ओठ कापले जातात आणि त्यामध्ये माती किंवा लाकडी गोल प्लेट घातली जाते. या प्लेटचा आकार काळानुसार, वाढवण्यात येतो, त्यामुळे त्यांच्या ओठांवरील छिद्र मोठं होतं जातं.
रिपोर्टनुसार, इथिओपियातील मुर्सी जमातीचे पुरुष महिलांवर अत्याचार करणे योग्य असल्याचे मानतात. हे पुरुषत्वाचे लक्षण असल्याची त्यांची मान्यता आहे.
मुर्सी जमातीच्या महिलांसाठी बनवलेल्या या नियमावर वेगवेगळ्या देशांमध्ये टीका केली जाते. सध्या इथिओपियामध्ये मुर्सी जमातीची संख्या केवळ 10 हजार आहे.
या जमातीच्या हिंसक व्यवहारामुळे इथिओपिया सरकारने त्यांच्याशी संपर्क ठेवण्यास बंदी घातली आहे.
मुर्सी जमातीच्या स्त्रियांचे ओठ आणि कान कापण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. यामुळे महिलांची प्रजनन क्षमता वाढते असा समज आहे.
मुर्सी जमातीतील महिलांचे वयाच्या 12 ते 16 व्या वर्षीच लग्न होते, असं इंटरनेटवरील अहवालात म्हटलं आहे.
मुर्सी जमातीतील पुरुषांचा असा समाज आहे की, लग्नानंतर ओठ आणि कान कापल्याने स्त्रिया कुरूप दिसतील. यामुळे, त्यांच्याकडे इतर कुणी पाहू शकणार नाही.
एका अहवालानुसार, ही जमाती जगातील सर्वात धोकादायक जमातींपैकी एक आहे. त्यांच्या परवानगीशिवाय कोणी त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला तर हे लोक त्यांना ठार मारतात, असं सांगितलं जातं.