Turkey Earthquake: तुर्की-सीरियात भूकंपामुळे हाहा:कार, 2300 जणांचा मृत्यू
Turkey-Syria Earthquake: तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपामध्ये आतापर्यंत 2300 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. (Source: AP)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभूकंपामुळे हजारो जण जखमी झाले आहेत. मृतांच्या आकड्यात अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय. (Source: AP)
तुर्कीमध्ये पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी पहिला भूकंपाचा धक्का जाणवला. त्यानंतर दुपारी 1 वाजून 24 मिनीटांनी दुसरा धक्का बसला. त्यानंतर सायंकाळी तिसरा धक्का बसला.. (Source: AP)
एक मोठा भूकंप झाल्यानंतर त्यानंतर इतर काही लहान-लहान भूकंपांची मालिका सुरू होते. (Source: AP)
तुर्कीत गेल्या 24 तासात भूकंपाचे 39 धक्के बसले आहेत. (Source: AP)
गाझियनटेप हे भूकंपस्थानापासून सीरिया हा देशही जवळ आहे. त्यामुळे या भूकंपाची तीव्रता तुर्की आणि सीरियामध्ये जाणवली असून त्यामध्ये आतापर्यंत 2300 हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. (Source: AP)
तुर्कीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य सुरू झालं आहे. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीसह सीरियामध्ये शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. (Source: AP)
या भूकंपाचा फटका सर्वच प्रमुख शहरांना बसल्यामुळे जनजीवनही विस्कळीत झालं आहे. अजूनही अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती आहे. त्यामुळे बचाव आणि मदतकार्य मोठ्या प्रमाणावर चालवले जात आहे. (Source: AP)
भूकंपाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी तातडीची बैठक घेतली, त्यामध्ये भूकंपग्रस्तांना शक्य ती सर्व मदत देण्याचे आदेश दिले आहेत. (Source: AP)
अनेक देश आपत्तीग्रस्त तुर्कीला मदत करणार आहेत. या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. (Source: AP)
भूकंपाच्या दरम्यान तुर्कस्तानच्या अनेक भागात तापमान शून्याच्या खाली नोंदवण्यात आले आहे. सध्या देशात कडाक्याची थंडी पडत आहे. (Source: AP)
भूकंपामुळे येथील विमानतळाच्या धावपट्टीचे नुकसान झालं आहे. बर्फवृष्टीमुळे बचाव कार्यातही अडचण निर्माण झाली आहे. (Source: AP)
सीरियाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा भूकंप असल्याचं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. (Source: AP)
भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की दोन्ही देशातील शेकडो इमारती कोसळल्या.(Source: AP)
अनेकजणांची कुटुंब रस्त्यावर आली आहेत. काहींची घरं जमीनदोस्त झाली तर अनेकांचा संसार उद्धवस्त झाला आहे. (Source: AP)