Grammy Awards 2023: कलाकारांच्या स्वप्नातला ग्रॅमी Beyonce नं 32 वेळा जिंकला
'ग्रॅमी पुरस्कार' वर प्रसिद्ध पॉप स्टार बियॉन्सेनं (Beyonce) आपलं नाव करलं आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appग्रॅमी पुरस्कार जिंकून बियॉन्सेनं इतिहास रचला आहे.
बियॉन्सेला इलेक्ट्रॉनिक म्युझिक अल्बम या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला आहे.
बियॉन्सेनं 65 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात आपल्या करिअरमधील 32 वा ग्रॅमी पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे.
32 ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी बियॉन्से ही जगभरातील एकमेव सेलिब्रिटी आहे.
बियॉन्सेनं हंगेरियन-ब्रिटीश कंडक्टर जॉर्ज सोल्टी (Georg Solti) यांना मागे टाकलं आहे. जॉर्ज सोल्टी यांनी 31 ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत.
ग्रॅमी पुरस्कार स्विकारल्यानंतर बियॉन्सेनं आपल्या भावना व्यक्त केल्या.
सोशल मीडियाच्या माध्यमातून बियॉन्सेचे चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.तसेच जगभरातील कलाकार आणि प्रेक्षक तिचं कौतुक करत आहेत.
बियॉन्सेनं 'ग्रॅमी पुरस्कार' सोहळ्यासाठी खास लूक केला होता.
'ग्रॅमी पुरस्कार' सोहळ्यासाठी तिनं सिल्वर ब्राऊन ड्रेस, हाय हिल्स आणि ब्लॅक ग्लव्ह्ज् असा क्लासी लूक केला होता.