Thane News: 'आर्यन स्टमक मॅन' पंडित धायगुडे यांचा विश्वविक्रम , 270 किलो वजनाची बाईक 150 वेळा गेली पोटावरून
काही माणसं ध्येयाने झपाटलेली असतात. जगावेगळं काहीतरी करून दाखवण्याचा ध्यासच त्यांनी घेतलेला असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशाच एका ध्येयवेड्या 42 वर्षीय पंडित धायगुडेंनी पोटावरून बाईक नेण्याचा 121 चा आपला विश्वविक्रम मोडत 377 बाईकचा एक नवा अध्याय लिहिला आहे.
पंडित धायगुडे या अवलियानं एका तासात 377 वेळा बाईक आपल्या पोटावरून नेण्याचा भीमपराक्रम करून दाखवलाय.
ठाण्यातील कोपरी कॉलनीतील धर्मवीर मैदानात रविवारी धायगुडेंनी हा पराक्रम करून दाखवला.
दणकट आणि वजनदार अशा 'इंडियन स्काऊट' या अमेरीकन बाईकचं वजन अंदाजे 270 किलोंच्या आसपास आहे.
त्यावर बसलेल्या रायडरचं अंदाजे वजन 75 किलो पकडलं तर दोघांचं मिळून तब्बल 350 किलो वजन भरतं.
हे वजन 1 तास 2 मिनिटं आणि 26 सेकेंदांत तब्बल 377 वेळा पंडित धायगुडेंनी आपल्या पोटावरून नेलं.
या विक्रमात इंडियन मोटर्स आणि त्यांच्या रायडर्सचाही तितकाच मोलाचा सहभाग होता.
ध्येयवेढ्या माणसांना विक्रमाचं क्षितिज सारखं खुणावत असतं आणि त्यासाठी आपली सगळी ताकद, मेहनत पणाला लावून ते आपलं ध्येय गाठतातच.
मूळचे सांगलीचे असलेले आणि नोकरीनिमित्त मुंबईत आलेले पंडित तुकाराम धायगुडे हे एका सर्वसामान्य कष्टकरी वर्गातून आलेल्या धायगुडेंनी आपल्या सगळ्या जबाबदा-या सांभाळत असे एक नव्हे तर अनेक विश्वविक्रम केलेत.