Thane Fire : ठाण्यातील ओरियन बिझनेस पार्क इमारतीला भीषण आग
ठाणे जिल्ह्यातील सिने वंडर मॉलजवळ (Cine Wonder Mall) असलेल्या ओरियन बिझनेस पार्क (Orion Business Park) इमारतीला भीषण आग
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओरियन बिझनेस पार्कला लागलेली आग भडकल्यानंतर शेजारी असलेल्या सिने वंडर मॉललाही आग लागली.
तब्बल 10 तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंआहे.
या आगीत इमारतीच्या आत पार्क केलेली 10 ते 12 वाहनेही जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले होते.
. इमारतीमध्ये असलेल्या सर्व लोकांना वेळीच सुखरुप बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही.
ओरियन बिझनेस पार्क ही घोडबंदर रोड, ठाण्यातील पाच मजली व्यावसायिक इमारत आहे. अचानक ही आग लागल्यानं परिसरातील नागरिकांची चांगलीच धावपळ झाली.
घोडबंदर रोडला जोडणाऱ्या रस्त्यावर आगीचे मोठे लोळ येत आहेत. त्यामुळं रस्त्यावर रात्री वाहतूक कोंडी झाली होती
आग लागलेल्या इमारतीमध्ये काही लोक अडकले असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, सर्वांनी सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ठाणे पश्चिम भागातील सिने वंडर मॉलजवळील ओरियन बिझनेस पार्क, कापूरबावडी या ठिकाणी आग लागली होती.