Thane Jail: कैद्यांनी तयार केलेल्या केकला मागणी; आठवडाभरात 10 लाखांची विक्री
आतापर्यंत तुम्ही नामांकित कंपन्यांच्या प्रसिद्ध उत्पादनांना सर्वसामान्य ग्राहकांमध्ये मागणी पाहिली असेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण तुरुंगातील कैद्यांनी बनवलेले पदार्थही लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत.
ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी बनवलेला केक सर्वसामान्यांनाच्या पसंतीला उतरत आहे.
कैद्यांनी तयार केलेल्या केकला चांगली मागणी असून केक विक्रीने विक्रम रचला आहे.
मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना भविष्यात स्वावलंबी बनवण्यासाठी नवीन उत्पादने तयार करण्यास प्रवृत्त करण्यात येते.
त्याचाच एक भाग म्हणून कैद्यांमार्फत केक तयार करण्यात येतो.
या कैद्यांची उत्पादने सर्वसामान्य ग्राहकांची खास पसंती बनली आहेत.
नाताळ आणि नवीन वर्षाची पूर्वसंध्या या कालावधीत कैद्यांनी तयार केकला विक्रमी मागणी होती.
ठाणे मध्यवर्ती तुरुंगातील कैद्यांसाठी सुरू असलेल्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.