PHOTO : कारखान्यांमधील सांडपाण्यामुळे अंबरनाथच्या वालधुनी नदीवर प्रदूषणाचा फेस
अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीवर प्रदूषणाचा फेस जमा झाल्याचं चित्र आज पाहायला मिळालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंबरनाथ एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांमधून या नदीत रासायनिक सांडपाणी सोडलं जातं.
त्यामुळेच या नदीत हे रासायनिक प्रदूषण होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या बाजूनी नदीत अनेक वर्षांपासून रासायनिक कारखान्यांकडून सांडपाणी सोडलं जातं.
या सांडपाण्यामुळे वालधुनी नदीचा रासायनिक नाला झाला असून याचा स्थानिकांना मोठा त्रास होतो.
आज सकाळी वालधुनी नदीत प्रदूषणाचा फेस जमा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला.
वालधुनी नदीत आजवर झालेल्या प्रदूषणानंतर दरवेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांची पाहणी केली जाते.
त्यानंतर कारखान्यांना नोटिसा बजावल्या जातात. मात्र यानंतर पुन्हा एकदा कंपन्यांकडून राजरोसपणे नदीत रासायनिक सांडपाणी सोडलं जातं.
त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एकंदरीत कार्यक्षमतेवरच नव्हे, तर विश्वासार्हतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.