Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Fitness: जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत!
आजच्या काळात वाढलेले वजन कमी करण्यासाठी लोक काय काय करत नाहीत. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत करतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवजन कमी करण्यासाठी आपण अनेक वेळा जिम डाएट फॉलो करतो, पण वजन कमी केल्यानंतर आपण पुन्हा नॉर्मल रूटीन डाएट सुरू करतो ज्यामुळे वजन वाढू लागते.
संशोधनात असे दिसून आले आहे की जे लोक वजन कमी करतात त्यापैकी फक्त 20 टक्के लोक ते दीर्घकाळ टिकवून ठेवू शकतात.
पण आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्सचा अवलंब करून वजन कमी करण्याचा प्रभाव कसा टिकवून ठेवू शकतो हे सांगणार आहोत.
झोपेची कमतरता हे अनेक समस्यांचे कारण आहे. झोपेच्या कमतरतेमुळे वजनही वाढू लागते. खराब झोप तुमचे एकंदर आरोग्य बिघडू शकते. दररोज 7-8 तासांची झोप घेणे खूप महत्वाचे आहे. योग्य झोप घेतल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बरोबर राहते. जर तुम्हाला पूर्ण आणि पुरेशी झोप मिळाली तर तुम्हाला दिवसभर उत्साही वाटते.
वजन कमी करताना आपण अनेकदा काटेकोर डाएट पाळतो, पण वजन कमी होताच आपल्याला अनेक गोष्टी खाण्याची इच्छा होते.
हे टाळण्यासाठी, आपण सर्व प्रकारच्या पोषक तत्वांचा समावेश असलेला आहार निवडा. तसेच, वेळेवर अन्न खाणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. संध्याकाळी 7 नंतर काहीही खाऊ नका, रात्री उशिरा स्नॅक्स टाळा आणि जर खायचेच असेल तर फळे, नट्स आणि डार्क चॉकलेट खा.
जे लोक वजन कमी केल्यानंतर वर्कआउट करणे बंद करतात, परंतु असे केल्याने तुमचे वजन पुन्हा वाढू शकते. म्हणूनच नियमित व्यायाम वगळू नका. दररोज किमान एक तास शारीरिक व्यायाम करा.टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (सर्व फोटो सौजन्य:unsplash.com)