Maharashtra Gas Leakage: अंबरनाथमध्ये वायूगळती, कंपनीत पाऊल ठेवताच दिसले केमिकलने भरलेले चंबू अन् उग्र दर्प
अंबरनाथ एमआयडीसी परिसरातील मोरीवली येथील निकाकेम केमिकल कंपनीतून रासायनिक मिश्रित केमिकल हवेत पसरल्याने नागरिकांच्या घशात खवखव आणि डोळ्यात जळजळ झाल्याची तक्रार समोर आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App12 सप्टेंबर रोजी रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत अंबरनाथ शहरात केमिकल पसरले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
निकाकेम केमिकल कंपनी ही दिवसा सुरू असते रात्री कंपनी बंद असते. कंपनीच्या परिसरात ऑइलचे ड्रम ठेवण्यात आले आहेत.
उष्णतेमुळे यात केमिकल मिश्रण झाल्याने हवेत वायू पसरला असल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
वायू प्रदूर्शन मंडळाच्या दोन हवा तपासणी मोबाईल व्हॅन वायू तपासणी करत असून ही तपासणी 24 तास सुरू राहणार आहे.
नेमका वायू कोणता आहे, याची तपासणी करण्याचे काम सुरु आहे. परिस्थिती नियंत्रित असली तरीही कंपनीच्या आत धूर निघत असून उग्र स्वरूपाचा वास येत आहे.
वायू प्रदर्शन मंडळाने फिरते वातावरणीय हवा गुणवत्ता मापक वाहन उभे केले असून 24 तासांनी रिपोर्ट येणार आहे.