Ankita Lokhande : अंकिता लोखंडेने केली बाप्पाची पूजा; मराठमोळा लूक होतोय व्हायरल!
बिग बॉस 17 (Bigg Boss 17)च्या सीजनमध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) हे जोडपं सर्वात जास्त चर्चेत आलं होतं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यांची भाडणं, रुसवे, फुगवे, त्यांचा खेळ या सगळ्यामुळे अंकिता आणि विकीच्या नात्याविषयी बरीच चर्चा झाली होती.
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या घरी लाडक्या गणरायाचं आगमन झालं आहे.
अशातच अभिनेत्री अंकिता लोखंडेच्याही घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं असून तिच्या घरी गौरीचंही आगमन झालं आहे. तिने इन्स्टाग्रामवर गौरीची पुजा करताना खूप सुंदर फोटो शेअर केले आहे.
अभिनेत्री अंकिता लोखंडे कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. तिने चाहत्यांसोबत गौरी पुजन करतानाचे खूप सुंदर फोटो शेअर केले आहेत.
मुळची महाराष्ट्रीयन असलेल्या अंकिताच्या घरी अगदी पारंपारिक पद्धतीनेच गणेशोत्सव आणि गौरी पुजन केले जाते. यावेळी अंकिताने आणि विकीने मराठमोळा लूक केलेला होता.
गौरी पूजनचे काही फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत. अंकिता आणि विकीच्या लूकचे चाहते कौतुक करीत असून 'बेस्ट जोडी'म्हणून त्यांना म्हणत आहेत.
फोटोमध्ये अंकिताने जांभळ्या रंगाची साडी नेसली असून लूकला साजेसे मराठमोळे दागिने आणि लूकला साजेसा मेकअप करत आपली फॅशन पूर्ण केली आहे.
अभिनेत्री कायमच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असतात.
बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन सहभागी झाले होते. त्यांची भाडणं, रुसवे, फुगवे, त्यांचा खेळ या सगळ्यामुळे अंकिता आणि विकीच्या नात्याविषयी बरीच चर्चा झाली होती.
त्याच दरम्यान, अंकिताच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना सगळ्यात जास्त उधाण आलं होते