Dhamani Dam : पालघरमधील धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडले, धरणातून 95 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर
Updated at:
28 Jul 2023 08:15 AM (IST)
1
पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
धरणाचे पाचही दरवाजे 200 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत.
3
धामणी आणि त्याच्या खाली असलेल्या कवडास धरणातून जवळपास 95 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत करण्यात आला आहे.
4
त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला आहे.
5
पुरामुळे नदीकाठच्या जवळपास 40 गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
6
पालघर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
7
धरण क्षेत्रातही तुफान पावसाची बॅटींग सुरु आहे.
8
त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
9
पालघरमधील धरण क्षेत्रात 324 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
10
तर आतापर्यंत 2907 मिलिमीटर पाऊस धरण क्षेत्रात झाला आहे.