Health Tips : रात्री झोप येत नाही ही तक्रारच संपून जाईल, लागेल गाढ झोप, खा 'हे' पाच पदार्थ
झोप न येण्याच्या समस्येमुळे वेगवेगळे आजार देखील उद्भवू शकतात. अपुऱ्या झोपेमुळे डोकेदुखी, चिडचिड होणे, लक्ष्य विचलित होणे असे परिणाम शरीरावर दिसू लागतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफोनच्या अतिवापरामुळे लोकांचे झोपेचे चक्र बिघडले आहे. काही लोकांना झोपण्यासाठी तासनतास झगडावे लागते.
एकदा झोपेचे चक्र बिघडले की, ते सोडवणे इतके सोपे नसते. झोप न येण्याच्या समस्येमुळे काही लोकांना वैद्यकीय उपचारही घ्यावे लागतात.
अपुऱ्या झोपेमुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकारांनाही आयते आमंत्रण मिळते.
जर तुम्हालाही अशाच समस्येचा सामना करावा लागत असेल तर आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या सेवनाने तुम्हाला गाढ झोप येईल.
दूध हा संपूर्ण आहार म्हणून ओळखला जातो. कॅल्शियम मुबलक प्रमाणात असल्यामुळे दुधामुळे झोपेची समस्याही कमी होते. झोपेच्या समस्येत रात्री हळदीचे दूध प्यावे. झोपण्याच्या सुमारे 30 मिनिटे आधी हळदीचे दूध प्यायल्याने चांगली झोप लागते.
केळीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. पण शरीराला बळ देणारे हे फळ झोपेच्या समस्येतही खूप फायदेशीर आहे. रोज सकाळी केळी खाल्ल्याने झोपेची समस्या दूर होण्यास मदत होते.
तुम्हाला हे ऐकून विचित्र वाटेल, पण मासे खाल्ल्याने झोपेच्या समस्याही सुधारतात. माशांमध्ये व्हिटॅमिन-डी आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड आढळतात, ज्यामुळे झोपेची समस्या कमी होण्यास मदत होते.
जेव्हा कधी स्मरणशक्ती वाढवण्याचा विचार येतो तेव्हा बदामाचे नाव सर्वात आधी घेतले जाते. पण याशिवाय चांगल्या झोपेसाठीही हे फायदेशीर आहे. ज्या लोकांना रात्री झोपेचा त्रास होतो त्यांनी बदाम जरूर खावे. किती बदाम खावेत हे बहुतेकांना माहिती नसते, तर झोपण्यापूर्वी 2 बदाम खावेत.
चांगली झोप येण्यासाठी अक्रोड खाणे अधिक प्रभावी मानले जाते. अक्रोड सारख्या नट्सला मेलाटोनिनचा चांगला स्रोत मानले जाते. या नट्समध्ये फॅटी अॅसिड देखील असते, जे आपल्याला चांगली झोप येण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, त्यात अल्फा लिनोलेनिक अॅसिड असते जे ओमेगा -३ फॅटी ऍसिडचा एक प्रकार आहे. हे शरीरात डीएचएमध्ये बदलते आणि चांगली झोप आणण्यास मदत करते.