Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO : AC खरेदी करताय, 'या' पाच गोष्टी नक्की लक्षात ठेवा!
उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून घरात दिवसरात्र पंखे सुरु आहे. पण तरीही आराम मिळत नसेल आणि तुम्ही एसी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. घरासाठी किंवा ऑफिससाठी योग्य एसी कसा निवडाल? हा विचार करणं कधीकधी फारच कठीण होतं. पण एसी खरेदी करताना काही बाबी निश्चित लक्षात घ्यायला हव्यात. मात्र तुम्ही स्वतःसाठी सर्वोत्तम एसी कसा निवडू शकता हे या लेखातून सांगणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्प्लिट एसी : नावावरुनच समजतं की या एसीचे दोन उपकरणं असतात. एक उपकरण खोलीत आणि दुसरा बाहेर लावलं जातं. दोन युनिट वेगळे असतील आणि पाईप्सने जोडलेले असतील तर त्याचा देखभाल आणि इन्स्टॉलेशनचा खर्च देखील जास्त आहे. विंडो एसीच्या तुलनेत स्प्लिट एसी महाग असतात पण याचा आवाज कमी असतो. ते कोणत्याही भिंतीवर लावू शकतात, भिंत पातळ असली तरीही.
क्षमता : योग्य एसी घेण्यासाठी, सर्वात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे ती म्हणजे त्याची क्षमता. तुम्हाला तुमच्या खोलीसाठी किती क्षमतेचा एसी लागेल हे गोष्टी लक्षात घ्यावी लागेल. क्षमता पाहण्यासाठी तुमच्या खोलीचा आकार आणि त्या खोलीच्या किती भिंतींवर सूर्यप्रकाश थेट पडतो हे पाहावं लागेल.
एनर्जी रेटिंग : तुमच्या वीज बिलात एसीचा मोठा वाटा असतो असं बऱ्याच लोकांना वाटतं. जेव्हा तुम्हाला एनर्जी रेटिंगची माहिती नसते तेव्हाच हे घडतं. चांगल्या एनर्जी रेटिंग असलेले मॉडेल खरेदी केल्यास तुम्हाला फायदा होईल. उच्च रेटिंग असलेले एसी महाग असतात. तुमच्या नवीन डिव्हाईसवर नेहमी BEE एनर्जी रेटिंग स्टिकर पाहा. ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीद्वारे प्रत्येक एसी 5-स्टार स्केलसोबत येईल. पॉवर एफिशियन्सीसह तुमचा एसी किती चांगला आहे हे इथलं रेटिंगवरुन ठरतं. नेहमी 5-स्टार मॉडेल घेण्याचा प्रयत्न करा.
इन्व्हर्टर एसी आणि नॉन-इन्व्हर्टर एसी : जेव्हा एसीचा विचार केला जातो, तेव्हा तुम्हाला इन्व्हर्टर एसी आणि नॉन-इन्व्हर्टर एसी दोन्ही मिळू शकतात. नॉन-इन्व्हर्टर एसीमध्ये ठराविक वेगाने चालणारा कम्प्रेसर असतो. हा एकतर चालू किंवा बंद केला जाऊ शकतो. वापरादरम्यान, कम्प्रेसर चालू होईल आणि जोपर्यंत तुमची खोली आवश्यक तापमानापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत चालू राहिल, नंतर बंद होतो. इन्व्हर्टर एसी तुमच्या वॉल सॉकेटमधून एसी करंट डीसीमध्ये बदलतात आणि नंतर कॉम्प्रेसरसाठी एसीमध्ये बदलतात. यामुळे उपकरणाला ऊर्जा मिळते. कम्प्रेसरचे अधिक नियंत्रित कार्य सक्षम करणे हा त्याचा उद्देश आहे.