PHOTO : भारतातील उत्पादन बंद करण्याचा Ford India चा निर्णय, चार हजार भारतीयांचा रोजगार बुडणार
कार निर्मितीमध्ये अग्रेसर असणाऱ्या जगप्रसिद्ध फोर्ड या अमेरिकन कंपनीने भारतातील आपले मॅन्युफॅक्चरिंग युनिट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. (Photo:@FordIndia/Twitter)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफोर्ड कंपनीच्या या निर्णयामुळे चार हजार भारतीयांचा रोजगार जाणार आहे. फोर्ड या अमेरिकन कंपनीने भारतीय बाजारपेठेत 25 वर्षांपूर्वी एन्ट्री केली होती. (Photo:@FordIndia/Twitter)
फोर्ड इंडियाचे सानंद आणि चेन्नई या ठिकाणी दोन मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या आर्थिक नुकसानीमुळे ही युनिट्स बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. (Photo:@FordIndia/Twitter)
फोर्ड कंपनीला भारतात गेल्या 10 वर्षांमध्ये दोन अब्ज डॉलर्सच्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. (Photo:@FordIndia/Twitter)
मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स जरी बंद केली जाणार असली तरी कंपनीच्या कारची विक्री सुरुच राहणार आहे. तसेच कंपनीच्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी डीलर्सची नियुक्ती करण्यात येणार आहे. (Photo:@FordIndia/Twitter)
जनरल मोटर्स आणि हार्ले डेविडसन या अमेरिकन कंपन्यांनंतर भारतातील आपले उत्पादन बंद करणारी फोर्ड ही तिसरी अमेरिकन कंपनी आहे. (Photo:@FordIndia/Twitter)