Bike Tips : पावसाळ्यात बाईक चालवताना काय काळजी घ्याल?
सध्या पावसाळा सुरु आहे आहे. पावसाऱ्यात ओल्या रस्त्यावरुन पावसात गाडी चालवणे मोठ्या कसरतीचं काम असतं. मुसळधार पावसात बाईक, स्कूटर चालवणे टाळले पाहिजे, परंतु अनेकदा लोक अशा काही चुका करतात ज्यामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. पावसाच्या दरम्यान दुचाकी चालवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहेल्मेट हे आपल्या डोक्याच्या संरक्षणासाठी खूप महत्वाचे आहे, म्हणून जेव्हा कधी बाईल चालवाल तेव्हा हेल्मेट नक्की घाला. हेल्मेटशिवाय बाईक चालवणे धोकादायक ठरू शकते. पावसात हेल्मेटच्या काचेमुळे पावसाचे पाणी डोळ्यांवर येत नाही, यामुळे गाडी चालवणे सोपे जाते.
पावसाळ्यात बाईकचा स्पीड कमी ठेवा. कारण पावसात रस्त्यावरील कर्षण कमी होते. तसेच मुसळधार पावसात दृश्यमानताही कमी असते. अशा परिस्थितीत तुमच्या वाहनाचा वेग फक्त 30 ते 40 किमी प्रति तास असावा.
पावसाळ्यात अचानक ब्रेक लावणे टाळले पाहिजे. जरी ब्रेक लावणे आवश्यक असले तरीही पुढील आणि मागील ब्रेक लीव्हर्स एकाच वेळी दाबा. असे केल्याने बाईक घसरणार नाही. तसेच वळणावर ब्रेक लावू नये, याची काळजी घ्या.
पावसाळ्यात अशा मार्गांवर जाऊ नये जिथे पाणी भरलेले असते. कारण कधीकधी मोठे खड्डे पाण्याने भरतात, ज्यामुळे अपघात होतात. एवढेच नाही तर त्या रस्त्यांवर बाईक किंवा स्कूटरच्या एक्झॉस्टमध्ये पाणी गेल्याने गाडी बंद पडू शकते.
फिंगर वाइपरबद्दल तुम्ही ऐकलं असेल. चारचाकी वाहनांमध्ये विंडस्क्रीनवर बसवलेल्या वायपर्स प्रमाणे ते काम करतात. फिंगर वाइपर्सच्या मदतीने हेल्मेट ग्लास पावसाच्या वेळी स्वच्छ करता येते आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा बाईक थांबवण्याची गरजही पडत नाही.