Sunetra Pawar: बारामती शहरातील विविध भागात सुनेत्रा पवार यांचे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आले
सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक बिरजू मांढरे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचे फ्लेक्स लावले होते. (File photo)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबिरजू मांढरे यानी सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर,साड्यांचे वाटप आणि खाऊवाटप असे कार्यक्रम आयोजित केले होते.तर विद्यार्थी काँगेसच्या वतीने देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या दोन्ही कार्यक्रमाचे फ्लेक्स शहरातील होते. (File photo)
भाजपने मिशन बारामती (Baramati) हाती घेतलं आणि एकच चर्चा रंगू लागली की सुप्रिया सुळे यांच्या विरोधातला उमेदवार कोण?गेल्या अनेक दिवसापासून बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार उभा राहणार असल्याची चर्चा सुरू झाली. (File photo)
या चर्चेचा दुसरा टप्पा म्हणजे पुण्यात सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेले शुभेच्छांचे बॅनर. पुण्यातील वारजे भागात हे बॅनर लागले आणि पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची चर्चा रंगू लागली..(File photo)
पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार अस समीकरण हे अनेक दशके राज्याच्या राजकारणात रुजले आहे.सुनेत्रा पवार राज्यातील पावरफुल घराण्यातील पावरफुल सुनबाई. (File photo)
सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यास भाजपाने पवार घरातील कुणालातरी उमेदवारी द्यायचे असे ठरवले असल्याची चर्चा झाली होती. त्याला अजित पवारांनी पूर्ण विराम देखील दिला होता. (File photo)
पण सुनेत्रा पवारांच्या (Sunetra Pawar) वाढदिवसानिमित्त लागलेला बॅनर मधून पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांचे उमेदवारीची चर्चा रंगू लागली आहे. (File photo)
बारामतीत देखील सुनेत्रा पवारांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स लागले पण चर्चा झाली मात्र पुण्यातील फ्लेक्सची. (File photo)
पुण्यातील वारजे भागात सुनेत्रा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना संसदेचे चित्र असलेला बॅनर (Banner) लागला आणि पुन्हा एकदा सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली आहे.