Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चंद्रभागेची पुन्हा दूरवस्था, भाविकांवर अधिक मासातील पवित्र स्थान दूषित पाण्यात करण्याची वेळ
सध्या अधिक मास सुरु असल्यामुळे चंद्रभागा स्नान व श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी दररोज लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत येत असताना चंद्रभागेची मात्र दूरवस्था झाल्याने भविकांमध्ये मोठी नाराजी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचंद्रभागा वाळवंट आणि नदी पात्रात घाणीचे साम्राज्य पसरले असून पाण्याला वास येत असल्याने अशा घाण पाण्यातच या पुरुषोत्तम मासाचे पवित्र स्नान करावे लागत आहे.
सध्या नदीच्या पाण्याला दुर्गंधी येत असून स्नानानंतर अंगाला खाज सुटत असल्याच्या तक्रारी भाविक करु लागले आहेत.
विठूरायाच्या दर्शन व्यवस्थेत सावळा गोंधळ सुरु असताना चंद्रभागेची अवस्थाही खराब झाल्याने रोज येणारे हजारो भाविक व्यवस्थेवर नाराज होत आहेत.
दर तीन वर्षांनी एकदा येणाऱ्या अधिक मासाचे वारकरी संप्रदायात मोठे महत्त्व असल्याने रोज चार ते पाच लाख भाविक पंढरपूरला येत आहेत.
यातच शनिवार आणि रविवारी वीकेंडला तर यात्रा भरल्याचाच अनुभव येतो.
अधिक मासातील पंधरा दिवसांच्या व महिन्याच्या एकादशीलाही लाखो भाविकांची उपस्थिती राहत असल्यामुळे पंढरीनगरी दुमदुमली जात आहे.
मात्र, याच भाविकांना सध्या चंद्रभागेतील अस्वच्छ आणि गढूळ पाण्याचा सामना करावा लागत आहे. या पाण्याचा उग्र वास येऊ लागला आहे.
त्यामुळे मोठ्या आस्थेने आलेल्या भाविकांना नाईलाजाने दुर्गंधीयुक्त पाण्यातच पवित्र चंद्रभागा स्नान उरकावे लागत आहे.
यामुळे भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जात असून, उजनी धरणातून पाणी सोडावे व चंद्रभागा वाहती ठेवावी, अशी मागणी होत आहे.