बांगडा, कोळंबी स्वस्त; सुरमाई, पापलेट महाग; जाणून घ्या माशांचे दर
कोकणात जवळपास दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर ऑगस्ट महिन्यामध्ये मासेमारी पुन्हा सुरु झाली आहे. दरम्यान, मासेमारीच्या हंगामाच्या सुरुवातीलाच मच्छिमारांच्या जाळ्यात बांगडा आणि प्रॉन्स जातीचे मासे मोठ्या प्रमाणात सापडत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे त्यांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे आहेत. पण त्याचवेळी सुरमई, पापलेट, हलवा या माशांचे दर चढे आहेत. असं असलं तरी बाजारात मासे खरेदीसाठी सध्या चांगलीच गर्दी दिसून येत आहे.
सध्या समुद्र देखील काही प्रमाणात खवळलेला आहे. त्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटिंगची संख्या कमी आहे. दरम्यान नारळी पौर्णिमेनंतर माशांची आवक आणखी वाढू शकेल अशी शक्यता आहे.
सध्या जेट्टीवर बांगडा 80 ते 100 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. तर इतर माशांचे भाव मात्र चढेच आहेत. तर कोळंबी 250 ते 300 रुपये किलो दराने मिळत आहे.
टायगर प्रॉन्स - 500 ते 550 रुपये किलो, सुरमई - 800 ते 1000 रुपये किलो, पापलेट - 700 ते 800 रुपये किलो दराने मिळत आहे.
याशिवाय मोडोसा - 600 रुपये किलो, हलवा - 600 ते 800 रुपये किलो, बोंबील - 230 ते 300 रुपये किलो, सौंदल - 300 ते 330 रुपये किलो दराने विक्री होत आहे
पावसाळा सुरु झाल्यावर जून आणि जुलै महिन्यात बंद असलेली कोकणातील मासेमारी ऑगस्ट महिन्यापासून सुरु होते.
दरम्यान नारळी पौर्णिमेनंतर माशांची आवक आणखी वाढू शकेल अशी शक्यता मच्छिमारांनी व्यक्त केली आहे.