Mahadev Vivah : वेळापूरमधील श्री अर्धनारी नटेश्वर मंदिरात पार पडला महादेवाचा विवाह सोहळा!
माळशिरस तालुक्यातील वेळापूर गावचे ग्रामदैवत श्री अर्धनारी नटेश्वर देवाचा विवाह सोहळा रात्री बारा वाजता संपन्न झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेवाच्या विवाह सोहळ्यानिमित्त पंचक्रोशीतील देवाच्या मानाच्या कावडी वाजत गाजत मंदिरात आणण्यात आल्या.
त्यानंतर श्री अर्धनारी नटेश्वर देवाला पोशाख करुन देवाला बाशिंग बांधण्यात आले
मंगलाष्टका संपन्न झाल्यावर उपस्थित भाविकांनी देवावर तांदूळटाकत या ठिकाणी देवाचा विवाह सोहळा संपन्न झाला.
पिंडीवर अर्धे महादेव आणि अर्धी पार्वती असलेली ही जगातील एकमेव प्राचीन मूर्ती असून अत्यंत जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची ओळख आहे.
श्री अर्धनारी नटेश्वर ग्रामदैवताची यात्रा चैत्र पौर्णिमेस होते.
शुद्ध पंचमीस हळदी, अष्टमीस लग्न व पौर्णिमेस वरात आणि वद्य अष्टमीस सोळावी असा महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो.
श्री अर्धनारी नटेश्वर मंदिर भारतीय पुरातन वास्तू संरक्षण खात्याच्या देखरेखीत आहे.