Solapur Anganwadi Sevika Agitation : आधी थाळीनाद, मग लाटणे दाखवले, आता चटणी भाकर खात आंदोलन; अंगणवाडी सेविकांचा एल्गार
सोलापुरात मागील तीन दिवसापासून अंगणवाडी सेविका जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आंदोलन करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुधवारी अंगणवाडी सेविकांनी चटणी भाकर आंदोलन करत शासनाचा निषेध व्यक्त केला.
मानधनात वाढ, पोषण ट्रॅकर मराठीत करणे, नवीन मोबाइल, ग्रॅच्युइटी लागू करणे, आहार आणि इंधनाचे दर वाढवणे आदी मागण्यांकडे राज्य सरकार दोन वर्षांपासून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अंगणवाडी सेविकांचा आहे.
त्या निषेधार्थ राज्यभरातील दोन लाख अंगणवाडी सेविका तीन दिवसांपासून संपावर उतरल्या आहेत.
सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालय इथे अंगणवाडी सेविका दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत.
आधी थाळी नाद आंदोलन त्यानंतर लाटणे दाखवून आंदोलन करण्यात आले.
आधी थाळी नाद आंदोलन त्यानंतर लाटणे दाखवून आंदोलन करण्यात आले.
लोकांच्या मुलांना कुपोषणापासून दूर ठेवण्यासाठी अंगणवाडी सेविका काम करत असतात.
मात्र केवळ आठ हजार रुपयांच्या मानधनात घर चालवताना त्यांच्या स्वतःच्या मुलांवर कुपोषणाची वेळ आली आहे.
या अंगणवाडी सेविका आपल्या घरात चटणी भाकरच खातात. तेच दाखवण्याचा प्रयत्न आंदोलनाच्या निमित्ताने केल्याची प्रतिक्रिया अंगणवाडी सेविका कर्मचारी संघांचे अध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी दिली.