Solapur News : सोलापुरात मराठा आरक्षणाची धग, टायर जाळत केलं रास्ता रोको
आफताब शेख, एबीपी माझा
Updated at:
30 Oct 2023 07:38 PM (IST)
1
सध्या मराठा आंदोलनाची धग संपूर्ण राज्यात पाहायला मिळतेय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी जाळपोळ झाल्याच्या घटना घडत आहेत.
3
सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावर मराठा समाजाच्या आंदोलकांकडून रास्ता रोको करण्यात आले.
4
रस्त्यावर मोठ्या संख्येने टायर जाळत हा रास्ता रोको करण्यात आला.
5
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात हे आंदोलन करण्यात आले.
6
रस्त्याच्या दोन्ही बाजूला किमान 40 ते 50 टायर यावेळी जाळण्यात आले.
7
तसेच यावेळी आंदोलकांकडून राजकीय नेत्यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी देखील करण्यात आली.
8
राष्ट्रीय छावा संघटना, सकल मराठा समाज संघटनांच्या वतीने हे रास्ता रोको करण्यात आले.