ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर... खंडग्रास चंद्रग्रहणात विठुराया, रुक्मिणी मातेला चंद्रभागेचं स्नान!

पंढरपूरमध्ये खंडग्रास चंद्रग्रहणात श्री. विठ्ठल रुक्मिणी मातेला चंद्रभागेचं स्नान घालण्यात आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
खंडग्रास चंद्रग्रहण असल्याने श्री. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपचारांमध्ये बदल करण्यात आले होते.

ग्रहणाच्या वेदकाळात विठुरायाला रुक्मिणी मातेला रात्री एक वाजता चंद्रभागेवरून पाणी आणून पहिलं स्नान घालण्यात आलं.
मोक्ष ग्रहणानंतर दुसरे स्नान घालण्यात आले. त्यानंतर पहाटे चार वाजता काकड आरती झाली. सकाळी सहा वाजता भाविकांसाठी मंदिर चरण स्पर्श दर्शनासाठी खुले करण्यात आले.
शनिवारी रात्री 11 वाजून 32 मिनीटांनी खंडग्रास चंद्रग्रहणाला सुरुवात झालेली
पहाटे 3 वाजून 56 मिनीटांनी चंद्रग्रहण संपलं
तीस वर्षानंतर पहिल्यांदाच पौर्णिमेनंतर ग्रहण होतं.
ग्रहणकाळात धार्मिक विधी आणि मंदिरातील पुजा बंद होत्या.
संपुर्ण ग्रहणाचा काळ 4 तास 25 मीनिटांचा होता. तर ग्रहणाचा पर्व काळ हा 1 तास 18 मीनिटांचा होता.