‘मन की बात’मध्ये छायाचित्रकार राहुलच्या कामगिरीचा गौरव; पंतप्रधानांनी दखल घेतल्याने पंढरपूरचे नाव उंचावले
नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथील अमृत उद्यानात मेळाव्यांच्या प्रदर्शनात आषाढी यात्रा , हुलजंती येथील यात्रा आणि म्हसवड यात्रेतील आपले फोटो देणाऱ्या विठ्ठल मंदिराचा छायाचित्रकार राहुल गोडसे यांचे फोटो दाखवत मोदी यांनी गौरव केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशातील सर्व सण , उत्सव , यात्रा , जत्रा हा या प्रदर्शनाचा विषय होता. यासाठी देशभरातून जवळपास 11 हजार छायाचित्रकारांनी आपले फोटो पाठवले होते.
यामध्ये पुरस्कार प्राप्त 60 छायाचित्रे आणि ज्युरी सदस्यांनी टिपलेली 22 सर्वोत्तम छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.
यामध्ये पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचे छायाचित्रकार राहुल गोडसे यांच्या तीन फोटोंची निवड करण्यात आली होती.
यामध्ये आषाढी यात्रेतील भाविक , हुलजंती येथील जत्रा आणि म्हसवड येथील फोटोंचा समावेश होता.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत सांस्कृतिक मंत्रालयाने मेळा मोमेंट्स छायाचित्र स्पर्धा आयोजित केली होती, तर ललित कला अकादमीने संपूर्ण देशभरासाठी नोडल संस्था म्हणून या स्पर्धेचे कामकाज पाहिले.
सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते ऑक्टोबर 2022 मध्ये या स्पर्धेचे उद्घाटन झाले होते. ही स्पर्धा 1 ऑक्टोबर 2022 ते 31 मार्च 2023 या सहा महिन्यांच्या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.
अकादमीने लोकांना त्यांच्या जवळच्या पारंपारिक मेळ्यांना आणि उत्सवांना भेट देण्यासाठी आणि काळाच्या ओघात मागे पडलेल्या आठवणींना उजाळा देण्याच्या उद्देशाने दिलेल्या संकल्पनेनुसार सर्वोत्तम छायाचित्रे क्लिक करण्यासाठी प्रोत्साहित केले होते .
या फोटोंचे प्रदर्शन देशवासियांसाठी राष्ट्रपती भवन येथे आयोजित केले होते .