PHOTO : विजयादशमीनिमित्त विठ्ठल रखुमाईच्या गाभाऱ्याला झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट
आज विजयदशमी अर्थात दसरा निमित्त श्री.विठ्ठल आणि श्री.रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्याची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसजावटीसाठी झेंडूची फुले वापरली असून गाभारा अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.
आजची आरास पुण्याचे भाविक राम जांभुळकर यांच्यातर्फे करण्यात आली आहे.
दरवर्षी अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दसरा अतिशय उत्साहात साजरा केला जातो. यालाच विजयादशमी देखील म्हटले जाते.
या दिवशी रावण दहन आणि सरस्वती पूजन, शस्त्रपूजा केली जाते.
दसऱ्याला सीमोल्लंघन करण्याची आणखी एक प्रथा आहे.
याआधी घटस्थापनेच्या दिवशी विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात फुलांची आरास करण्यात आली होती.
विविध सण आणि उत्सवांच्या निमित्ताने श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यात फळाफुलांची सजावट करण्यात येते.
विठुराया आणि रुक्मिणी मातेचं हे अनोखे रुप डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांची गर्दी होते.