Health Tips : काजूचे असेही आहेत आश्चर्यकारक फायदे
काजूमध्ये भरपूर पोषक असतात. मिठाई आणि गोड पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचविष्ट असण्यासोबतच काजू शरीरासाठीही खूप फायदेशीर आहे. विशेषतः काजूचा वापर आपल्या हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर आहे.
काजूमध्ये मॅग्नेशियम, कॉपर, मॅंगनीज, झिंक, पोटॅशियम, सेलेनियम यांसारखे खनिजे असतात, जे आरोग्य उत्तम राखण्यास मदत करतात.
काजूमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी खूप कमी असते. यामध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडेंट इतके शक्तिशाली असतात की ते तुम्हाला हृदयविकारांपासून दूर ठेवतात.
काजूमध्ये असलेले ओलेइक अॅसिड हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते. काजू अनसॅच्युरेटेड फॅट एचडीएल कोलेस्टेरॉल म्हणजेच चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढवतात.
काजूमध्ये उच्च पोटॅशियम आणि कमी सोडियम सामग्रीमुळे रक्तदाब कमी होतो, जे बीपी नियंत्रित करते.
काजूमध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे कॉपर खूप फायदेशीर आहे. हे लोहाच्या चयापचयात मदत करते, जे अनियमित हृदयाचे ठोके रोखते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.