650 किलो शेवंती, 180 किलो भगवा झेंडू अन् 300 किलो अष्टराची फुलं; लक्ष्मीपूजनासाठी विठुरायाच्या गाभाऱ्याला आकर्षक सजावट
दिवाळी हा महाउत्सव विठ्ठल मंदिरात रोज वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळीनिमित्त देशभरातील लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत असताना आजच्या या आकर्षक फुलांच्या सजावटीमुळे विठ्ठल मंदिर सुवासिक वासाने घमघमून गेले आहे.
या सजावटीसाठी पांढरी शेवंती 650 किलो, भगवा झेंडु 180 किलो, पिवळा झेंडू 250 किलो, कण्हेर 35 किलो, अष्टर 300 किलो वापरण्यात आले.
हिरवा पाला 200 माळा, गुलाब १०० गड्डी, कमिनी ३०० गड्डी, शेवंती १०० गड्डी इत्यादी फुलांचा वापर करण्यात आला आहे.
सेवेकरी अर्जुन हनुमान पिंगळे, बीड यांनी सेवाभावी तत्वावर मोफत फुलांची आरास करून दिली आहे.
या फुलांच्या सजावटीसाठी श्री फ्लावर्स पुणे यांच्या सुमारे 25 कामगारांनी 8 तास परिश्रम घेतले आहेत.
विठ्ठल चौखांबी , सोळखंबी , रुक्मिणी मंदिर परिसर , महाद्वार , विठ्ठल सभा मंडप अशा मंदिरातील विविध भागांना ही फुलांची सजावट केलेली आहे.
या सजावटीमुळे संपूर्ण मंदिराचं रुपडं पालटून गेलं आहे.