Laxmi Pujan 2024 Upay : दिवाळीला तिजोरीत 'या' 3 वस्तू नक्की ठेवा; वर्षभरात पैसा होईल दुप्पट
दिवाळीला देवी लक्ष्मीची पूजा करतात. या दिवशी धनलाभासाठी विशेष उपाय केले जातात. त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या तिजोरीत काही वस्तू ठेवल्या तर तुम्हाला कधीही पैशांची कमतरता भासत नाही असं म्हणतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज देशभरात दिवाळीचा सण साजरा केला जातोय. यावेळी संध्याकाळच्या वेळी देवी लक्ष्मीची पूजा करतात. लक्ष्मीची धन-संपत्तीची देवी म्हणतात त्यामुळे धन-संपत्तीशी संबंधित तुमच्या समस्या दूर होतात.
तिजोरीचा संबंधसुद्धा धनाशी संबंधित लावण्यात आला आहे. तसे, आपण पैसे पर्स किंवा पाकिटातही ठेवतो. पण, साठवलेला पैसा, दागिने यांसारख्या गोष्टी आपण तिजोरीतच ठेवतो.
आज दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच तिजोरीत काही वस्तू नक्की ठेवाव्यात. यामुळे आर्थिक समस्या दूर होते. मान्यतेनुसार, तिजोरीत या वस्तू ठेवल्या तर ती कधीच रिकामी नाही राहत.
देवी लक्ष्मीची पूजा करताना तुम्ही जी सुपारी चढवता ती सुपारी तिजोरीत ठेवावी. पूजेत ठेवलेल्या सुपारीला गौरी-गणेशाचं रुप मानलं जातं. त्यामुळे सुपारी लाल रंगाच्या कापडात बांधून तिजोरीत ठेवावी. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो.
तिजोरीत 10 रुपयांच्या नोटांचा बंच ठेवणं फार शुभ मानलं जातं. जर तुम्ही हा बंच नाही ठेवू शकत असाल तर एक पितळेचं, तांब्याचं किंवा चांदीचं नाणंसुद्धा ठेवू शकता. मात्र, यामध्ये एल्युमिनियमचं नाणं ठेवू नका.
तसेच, गोमती चक्रसुद्धा तिजोरीत ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे धन-संपत्तीत वाढ होते. याला तुम्ही पिवळ्या रंगाच्या कापडात बांधून तुम्ही तिजोरीत ठेवू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)