Vitthal Temple Decoration : प्रजासत्ताक दिनानिमित्त विठुराया तिरंगी रंगात न्हाऊन गेला
प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविठुराया तिरंगी रंगात न्हाऊन निघाला आहे.
आज नेमकी वसंतपंचमी असून तिथीनुसार विठ्ठल रुक्मिणी मातेचा स्वर्गीय विवाहसोहळा संपन्न होत आहे.
त्यामुळे विठ्ठल आणि रुक्मिणी चौखांबी, सोलखंबीला तिरंगी फुलांची अतिशय आकर्षक सजावट केली आहे.
पुणे येथील भाविक सचिन चव्हाण यांनी ही तिरंगी फूल सजावटीची सेवा अर्पण केली आहे.
विठ्ठल मंदिरात आज दुपारी बारा वाजता विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे.
या निमित्त पंढरपुरात जय्यत तयारी सुरु आहे.
विठ्ठल रुक्मिणीच्या या शाही विवाह सोहळ्यासाठी खास चेन्नई आणि बंगलोर इथून विवाहासाठीचे रेशमी पांढरे पोशाख आले आहेत.
बंगळुरु इथल्या एका भाविकाने विठ्ठल रुक्मिणी यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने पोषाख भेट दिला आहे.