Pandharpur: थोरात कुटुंबाने गौराईसमोर साकारलं हुबेहूब राम मंदिर; पाहा फोटो
गौराई समोरचे देखावे हे नेहमीच महाराष्ट्राची कलात्मक दृष्टी दाखवत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंढरपूरमधील स्वाती थोरात यांनीही घरातल्या गौराईसमोर आकर्षक देखावा साकारला आहे.
स्वाती थोरात यांनी गौराईसमोर हुबेहूब राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.
घरातील महिलांच्या मदतीने तब्बल 50 दिवस मेहनत घेऊन त्यांनी हा अयोध्येतील राम मंदिराचा आकर्षक देखावा साकारला.
सध्या अयोध्येत राम मंदिराचं काम सुरू असलं तरी नेमकं राम मंदिर कसं होणार? याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
याच राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती पंढरपूरच्या थोरात कुटुंबाने साकारली आहे.
राम मंदिर बनवताना तीन मजली हुबेहूब वास्तू बनवण्यात आली आहे.
याशिवाय मंदिरात असणारी कलाकुसर याचा बारकाईने विचार करण्यात आला आहे.
हे राम मंदिर बनवताना माउंट बोर्ड, कार्ड पेपर, ज्यूस स्ट्रॉ, जुने पॅकिंग बॉक्स आणि फेविकॉलचा वापर करण्यात आला आहे.
रामाचा पुतळा देखील कार्डबोर्डच्या मदतीने साकारण्यात आला आहे.
स्वाती प्रवीण थोरात, लक्ष्मी विलास थोरात आणि सरस्वती राजू थोरात या तीन महिलांनी ही अप्रतिम प्रतिकृती बनवली आहे.
मंदिराच्या मध्यावर झेंडा देखील बनवण्यात आला.
उत्कृष्ट लाईट इफेक्ट देऊन हे मंदिर अधिक आकर्षक बनवण्यात आलं.
हा राम मंदिराचा देखावा पाहण्यासाठी पंढरपुरातील थोरात कुटुंबाकडे सर्वांनी गर्दी केली आहे.
सर्व जण थोरात कुटुंबाची पाठ थोपटत आहेत, राम मंदिराच्या प्रतिकृतीची प्रशंसा करत आहेत.