PHOTO : चालकाचा निष्काळजीपणा, पंढरपुरात भरधाव वेगात धावणारी ट्रॅव्हल्स पलटी
पंढपुरात एक ट्रॅव्हल्स पलटी होऊन देवदर्शनासाठी निघालेले 28 भाविक जखमी झाले आहेत. तर एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएक ट्रॅव्हल्स तब्बल 38 भाविकांना घेऊन जात असताना मंगळवेढा तालुक्यातील येड्राव फाटा येथे ट्रॅव्हल्स पलटी झाल्यानं अपघात झाला. या अपघातात एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 28 भाविक जखमी झाले असून त्यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे.
एका खासगी ट्रॅव्हल्स 38 भाविकांना घेऊन देवदर्शनासाठी निघाली होती. अशातच सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यात येड्राव फाट्यावर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि भरधाव असणारी बस पलटी झाली. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात मरवडे रोडवरील येड्राव फाट्यावर झाला.
मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशातील 38 भाविकांनी घेऊन निघालेली ट्रॅव्हल्स संपूर्ण भारतभरात देवदर्शनासाठी यात्रा करणार होती. कर्नाटक येथे देवदर्शन करुन ते भाविक पंढरपूरकडे निघाले होते. पहाटे बस येड्राव फाटा येथे आल्यावर ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे बसचा अपघात झाला आणि बस पलटी झाली.
ट्रॅव्हल बस अतिवेगाने जात होती. तसेच ड्रायव्हर मोबाईलवर बोलत होता आणि त्यामुळेच त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं असल्याचं जखमी भाविकांनी यावेळी सांगितलं आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
बस पलटी झाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी जाऊन तात्काळ बचावकार्य सुरू केलं. बसमधील भाविकांना तात्काळ बाहेर काढण्यास सुरुवात केली.