PHOTO : गोकुळ मिल्क ई सुविधा अॅपचा शुभारंभ; कारभार अधिक गतीमान होणार
गोकुळचे शिल्पकार व माजी चेअरमन स्वर्गीय आनंदराव ज्ञानदेव पाटील-चुयेकर यांच्या 9 व्या पुण्यतिथीनिमित्त गोकुळ दूध संघाच्या आवारातील पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन आयोजित करण्यात आले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी दुधाची गुणवत्ता आणि त्याच्या मोजमापाची माहिती दूध संस्थांना त्वरित कळण्यासाठी गोकुळ मिल्क ई सुविधा अॅपचा शुभारंभ करण्यात आला.
या ॲपच्या माध्यमातून शेतकरी, दूध उत्पादक यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा जलद उपलब्ध होणार आहेत.
या अॅपमुळे अद्ययावत सुविधा शेतकरी आणि दूध उत्पादकांना देण्याचे काम पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली.
आनंदराव पाटील - चुयेकर यांनी गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून लाखो शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याचं मोलाचं काम केल्याचे सतेज पाटील म्हणाले.
गोकुळ दूध संघाचा विस्तार मोठ्या प्रमाणात करण्याबरोबरच 20 लाख लिटर दुधाचं लक्ष गाठलं गाठण्यासाठी सर्व संचालक एकत्रित येऊन निश्चितच प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.
‘गोकुळ’मध्ये दुधाची प्रत व वजन झाल्यानंतर सेकंदात ते प्राथमिक दूध संस्थांना कळणार आहे.
आगामी काळात या ॲपशी दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही जोडले जाणार आहे.
या ॲपद्वारे पशुखाद्यासह इतर सुविधांची नोंदणीही करता येणार आहे.
या ॲपद्वारे पहिल्या टप्प्यात प्राथमिक दूध संस्थांचे अध्यक्ष व सचिवांना जोडले जाणार आहे.