अस्थिरोगतज्ज्ञ ते वन्यजीव छायाचित्रकार; डॉ. व्यंकटेश मेतन यांनी मिळवली फोटोग्राफीमध्ये मास्टर्सची पदवी!
डॉ. व्यंकटेश मेतन हे सोलापुरातील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ असून त्यांनी नोएडा येथील प्रसिद्ध इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी (IIP) अकादमी, हिमालयान विद्यापीठातून “फाइन आर्ट फोटोग्राफीमध्ये मास्टर्स” ह्या अंतिम सत्र परीक्षेमध्ये ८६% मार्क्स मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन फाइन आर्ट फोटोग्राफीमध्ये मास्टर्स पदवी संपादन केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही महिन्यापूर्वी त्यांनी नोएडा येथील प्रसिद्ध एशियन अॅकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन (AAFT) येथून फोटोग्राफीमध्ये डिप्लोमा पूर्ण केला होता.
फाइन आर्ट फोटोग्राफीमध्ये मास्टर्स या अभ्यासक्रमात चौथ्या सत्रामध्ये डॉ. मेतन यांनी सोलापुरातील बिडी वळणाऱ्या महिलांच्या जीवनशैलीवर तीन महिने अभ्यास करून एक फोटोस्टोरी बुक प्रकाशित केले आणि कर्नाटकातील ४० प्राचीन मंदिरातील नृत्य करणाऱ्या शिल्पांवर सहा महिने अभ्यास करून “Study of imagery of 51 dance sculptures from the ancient temples of Karnataka State” हा एक अनोखा/ अद्वितीय प्रबंध लिहिला. (Image credit : Instagram @drmetanphotography)
वाईल्ड लाईफ, लँडस्केप, इंडियन हेरिटेज बिल्डिंग / टेम्पल्स, मॅक्रो आणि फूड फोटोग्राफीवर जास्त लक्ष केंद्रित करणार आहेत. सोलापुरातील प्राचीन मंदिराची छायाचित्रे काढून त्यावर पुस्तिका प्रकाशित करणार आहेत. (Image credit : Instagram @drmetanphotography)
सोलापुरातील व्यावसायिक फोटोग्राफरची गणना कलाकार या श्रेणीमध्ये व्हावी आणि त्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहेत. (Image credit : Instagram @drmetanphotography)
डॉ. मेतन यांच्या निसर्ग आणि वन्यजीव छायाचित्राचे प्रदर्शन जगप्रसिद्ध अश्या जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे दोन वेळा तसेच बंगलोर येथील प्रतिष्ठित “चित्रकला परिषद गॅलरी येथे तीन वेळा यशस्वीरित्या संपन्न झाले. (Image credit : Instagram @drmetanphotography)
डॉ. मेतन हे नॅशनल जियोग्राफ़ी ऑफ सोसायटी या जगप्रसिद्ध संस्थेचे सदस्य असून नजिकच्या काळात या संस्थेसाठी कार्य करणार आहेत. (Image credit : Instagram @drmetanphotography)
डॉ. मेतन हे झी ऑफिशियल म्युझिक व्हिडिओ उन लम्हों में या गाण्यासाठी तसेच तेरे हैं हम या गाण्यासाठी फोटोग्राफीचे संचालक (सिनेमॅटोफोटोग्राफेर) म्हणून काम केले आहे. (Image credit : Instagram @drmetanphotography)
कॉलेज ऑफ फाईन आर्टस् कर्नाटक चित्रकला परिषद बंगलोर, द फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई, युथ फोटोग्राफी सोसायटी बंगलोर ,फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणे, सोलापूर विद्यापीठ, इंडियन मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब अश्या अनेक प्रतिष्ठित संस्थांनी त्यांना फोटोग्राफी या विषयावर व्याख्यानासाठी वक्ता म्हणून आमंत्रित केले होते. (Image credit : Instagram @drmetanphotography)
(Image credit : Instagram @drmetanphotography)
डॉ. व्यंकटेश मेतन यांची भन्नाट सुंदर वन्यजीव छायाचित्रे सोशल मीडियावरती व्हायरल होतात. (Image credit : Instagram @drmetanphotography)
डॉ. व्यंकटेश मेतन यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल समाजातील सर्व थरातून त्यांचे कौतुक होत आहे. (Image credit : Instagram @drmetanphotography)