ASTRA Missile : पाकिस्तान आणि चीनला भरणार धडकी! एक घाव, शंभर तुकडे... स्वदेशी अस्त्र क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
अस्त्र मिसाइल हे हवेतून हवेत मारा करणारं स्वदेशी क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र Beyond Visual Range Attack करण्यास सक्षम आहे. या अस्त्र क्षेपणास्त्राची तेजस या लढाऊ विमानातून यशस्वी चाचणी करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतेजस फायटर जेटने 20 हजार फूट उंचीवरून अस्त्र क्षेपणास्त्र डागलं, ज्याने अचूकपणे लक्ष्यावर मारा केला. हे क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करण्यास सक्षम आहे.
अस्त्र क्षेपणास्त्राच्या चाचणीसाठी एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी, डीआरडीओ, एचएएल, सेंटर फॉर मिलिटरी एअरवर्थिनेस अँड सर्टिफिकेशन आणि एरोनॉटिकल क्वालिटी ॲश्युरन्सचे अधिकारी उपस्थित होते.
अस्त्र क्षेपणास्त्रे सध्या चाचणीच्या टप्प्यात आहेत. पण या स्वदेशी क्षेपणास्त्राच्या सामर्थ्याची चर्चा संपूर्ण आशियाभर पसरली आहे.
अस्त्र क्षेपणास्त्रामध्ये ऑप्टिकल प्रॉक्सिमिटी फ्यूज आहे, जे क्षेपणास्त्र लक्ष्यावर अचूक नजर ठेवते. लक्ष जागचा हलला तरी त्यावर अचूक निशाणा साधून मारा करण्यात हे सक्षम आहे.
अस्त्र क्षेपणास्त्राचे वजन 154 किलो आहे. लांबी 12.6 फूट आणि व्यास 7 इंच आहे. हे क्षेपणास्त्र आपल्यासोबत 15 किलो वजनाचे शस्त्र वाहून नेऊ शकते.
अस्त्र क्षेपणास्त्राची पल्ला 160 किमी आहे. ते कमाल 66 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकते. या क्षेपणास्त्राची सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे याचा वेग 5556.6 किमी/तास आहे. म्हणजे, शत्रूला पळून जाण्याचीही संधी मिळणार नाही.
अस्त्र क्षेपणास्त्राचं वैशिष्ट्य म्हणजे ते लक्ष्याच्या दिशेने सोडल्यानंतर त्याची दिशा हवेत मधेच बदलता येते.
सध्या या क्षेपणास्त्राचा पहिला प्रकार MiG-29 UPG/MIG-29K, Sukhoi Su-30MKI, तेजस Mk. 1/1A मध्ये बसवण्यात आलं आहे. भविष्यात हे क्षेपणास्त्र तेजस एमके 2, एएमसीए, टीडीबीएफ लढाऊ विमानांमध्येही बसवले जाईल. भारतीय हवाई दलाकडून जुन्या एमआयसीए क्षेपणास्त्राऐवजी स्वदेशी शस्त्रांवर भर देण्यात येत आहे.