Navratri 2022 : नवरात्रीनिमित्त रुक्मिणी मातेला महालक्ष्मी पोशाख तर विठुराया सजला पारंपारिक दागिन्यात
शारदीय नवरात्रीनिमित्त रुक्मिणी मातेला महालक्ष्मी देवीच्या पोशाखात सजविण्यात आले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअत्यंत आकर्षक पद्धतीने सजविलेले मातेचे रुप हिरेजडित मौल्यवान अलंकारात आधिकच खुलून दिसत होते.
मातेला मोरपंखी रंगाची पैठणी महालक्ष्मीच्या पद्धतीने नेसवण्यात आली होती.
भाळी चंदनाचा वैशिष्ट्यपूर्ण मळवट आणि त्यावर दागिन्याचा साज यामुळे विठ्ठल मंदिरात कोल्हापूरची महालक्ष्मीमाता अवतरल्याचा आभास होत होता.
श्री विठ्ठलाला लाल रंगाच्या मखमली अंगीवर निळ्या रंगाचे पितांबर परिधान करण्यात आले होते.
विठुरायालाही अतिशय दुर्मीळ अश्या ठेवणीतील दागिन्याने सजविण्यात आले
नवरात्रीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची लोभस रूपे पाहण्यासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
या सजावटीतील विठ्ठल रुक्मिणीची साजिरे रुप आणखीच उठून दिसत आहे.
विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी हजारो भाविकानी गर्दी केली आहे .
नवरात्रीनिमित्त मंदिरात रोज आकर्षक सजावट करण्यात येते.