Photo: दमदार आणि पॉवरफुल; आली जावाची नवीन बाईक; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Jawa ने भारतात आपली नवीन बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने Jawa 42 चे Bobber मॉडेल बाजारात उतरवले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाची एक्स-शोरूम किंमत भारतात त 2.06 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही कंपनीची दुसरी बाईक आहे, जी Bobber मॉडेलमध्ये आणली गेली आहे. कंपनीची पहिली बाईक जावा पेराक होती
जावा 42 बॉबर ही एक निओ-रेट्रो बाईक आहे, जी भारतातील क्लासिक बाईकच्या चाहत्यांना लक्षात ठेवून आणली गेली आहे.
जावा 42 बॉबरची डिझाइन जावा पेराक बॉबर सारखीच आहे. या बाईकमध्ये राउंड एलईडी हेडलॅम्प्स, राउंड एलईडी टेललॅम्प्स आणि स्मॉल टर्न इंडिकेटर देण्यात आले आहेत. बाईकला लो स्लंग रायडर सीट आणि ड्युअल एक्झॉस्ट सायलेन्सर मिळते. जे पेराकसारखेच आहे.
या बाईकचे सायलेन्सर मॅट फिनिशमध्ये ठेवण्यात आले असून याच्या टोकावर क्रोम फिनिश करण्यात आले आहे. जावा 42 बॉबर कंपनीने मिस्टिक कॉपर, मूनस्टोन व्हाईट आणि जॅस्पर रेड या तीन रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे.
बाईकच्या फ्युएल टँक आणि साइड फेंडरला रंग देण्यात आले आहे. फूट टाकीच्या दोन्ही बाजूला जावा बॅजिंग आहे, तर बाजूच्या फेंडरवर 42 बॉबर लोगो देण्यात आला आहे.
जावा 42 बॉबरमध्ये 334cc सिंगल-सिलेंडर लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे तेच इंजिन आहे जे कंपनी पेराकमध्ये देखील वापरले आहे. हे इंजिन 30.64 bhp ची पॉवर आणि 32.64 Nm टॉर्क जनरेट करते.
जावा 42 बॉबर कंपनीने फक्त स्पोक व्हीलमध्ये सादर केली आहे. बाईकच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागच्या बाजूला मोनोशॉक सस्पेन्शन युनिट आहे.
बाईकमध्ये संपूर्ण डिजिटल वर्तुळाकार इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. ज्यावर ट्रिप, मायलेज, स्पीड, गियर नंबर यासह अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे.
क्लासिक बाईक सेगमेंटमध्ये ही बाईक रॉयल एनफिल्ड क्लासिक 350, रॉयल एनफिल्ड हंटर 350, रॉयल एनफिल्ड Meteor, येझदी रोडस्टरशी स्पर्धा करू शकते. ही बाईक Benelli Imperiale 350 ला देखील टक्कर देऊ शकते.