'नाद' खुळा! शहाजीबापू उतरले लाल मातीच्या आखाड्यात; गावच्या यात्रेसाठी आणले थेट इराणचे पैलवान
रोज राजकारणातले डाव मारणारे शहाजीबापू आज लाल मातीच्या आखाड्यात उतरले खरे पण येथेही त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशहाजीबापू यांचे गाव असणारे चिकमहुद येथे सध्या ग्रामदैवत तामजाई देवीची यात्रा सुरू आहे.
या यात्रेनिमित्त बापूंनी गावात कुस्त्यांची मोठी स्पर्धा ठेवली आहे. दिवसभर आपल्या गावातील जत्रेत मग्न असणारे बापू संध्याकाळी कुस्त्यांच्या आखाड्यात देखील पोहचले.
राज्यातील अनेक नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचे आयोजन करत बापूंनी थेट इराणचे देखील पैलवानांना कुस्तीसाठी आपल्या गावात आणले होते.
हलग्यांच्या कडकडाटात कुस्त्या लावणारे बापू आज वेगळ्याच जल्लोषात दिसत होते.
खरंतर कुस्ती सारखी खिलाडूवृत्ती राजकारणात ठेवण्याचे धडे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिले. मात्र या संजय राऊतला सांगणारे कोणी गुरु भेटले नाहीत असा टोला लगावला.
आम्ही लहानपणापासून कुस्ती केलेली असून संजय राऊत हे कांदा पोह्याचे आहार घेणारे अशी मिश्किल कोटी देखील शहाजीबापू यांनी केली.
सध्या मुंबईमध्ये रोज एवढे राजकीय नाटक घडत असताना बापू मात्र आपल्या गावातील जत्रेत पूर्णवेळ थांबले आहेत.
राजकारणाचे मैदान रोजचे असते त्यामुळे गावाच्या जत्रेत आज लाल मातीच्या आखाड्यात उतरल्याने जुन्या आठवणी ताज्या होत असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.