In Pics : एकामागे एक दुखापती, तरी देखील ऑस्ट्रेलियन संघाचा कसून सराव सुरुच

भारताविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ कसून सराव करताना दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
संपूर्ण संघ भारतात पोहोचला असून प्रसिद्ध आणि महत्त्वाची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ सज्ज झाला आहे.

एकीकडे कांगारुंच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यातून आधीच बाहेर असताना आता आणखी एक खेळाडू या सामन्याला मुकणार असल्याचं समोर आलं आहे.
संघाचा दमदार अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीन दुखापतीमुळे सामन्याबाहेर झाला आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा अनुभवी खेळाडू स्टीव्ह स्मिथने 7 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
तो म्हणाला की, कॅमेरून ग्रीन पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता नाही. ग्रीन अद्याप त्याच्या बोटाच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यादरम्यान त्याला ही दुखापत झाली होती, त्यानंतर ग्रीनला त्याच्या बोटावर शस्त्रक्रिया करावी लागली.
दरम्यान या सर्व अडचणीनंतर देखील उर्वरीत संघ मैदानात घाम गाळताना दिसत आहे.
फलंदाजांसह गोलंदाज सर्वच मैदानात उतरले असून कसून सराव करत आहेत. यावेळी स्टाफही त्यांना संपूर्ण सपोर्ट करत आहे.
दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात यंदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये एकूण चार सामने खेळवले जाणार आहेत.
यातील पहिला सामना नागपूरमध्ये 9 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे.
दुसरीकडे टीम इंडिया देखील कसून सराव करत असून रवींद्र जाडेजाच्या परतण्याने संघाची ताकद आणखी वाढली आहे.